कंचनी…एक रहस्यमय स्वप्नकथा/लघुपट
Director :- Mr. Vijay Asaram Fangal







Reviews:
स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेला कंचनीचा महाल आज जीर्ण स्वरुपात उभा आहे .कंचनीमहालाचे जतन आणि संवर्धन व्हावे या हेतूने निर्माण केलेली शॉर्ट फिल्म कंचनी अतिशय उल्लेखनीय आहे .शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून आपण लावलेली वीट समाजामध्ये जागृती घडून आणेल आणि भारत सरकारच्या पुरातत्त्व खात्याला ही जाणीव होईल या मध्ये शंका नाही .सर्व कलाकारांनी केलेलं काम आणि आपले दिग्दर्शन अप्रतिम आहे .पुढील वाटचालीसाठी मनस्वी शुभेच्छा.💐💐💐👍
कैलास इंगळे:
खुप छान सर….. कंचनी च्या मनामध्ये असलेलं ….तिला वाटत असलेली तिच्या महालाची काळजी…..आपला महाल हा सुरक्षित रहावा….आपली ओळख कायम लोकांनी लक्षात ठेवावी….. माझं लोणार मधील कमळजा मातेच्या मंदिरातील दिवा बघण्याचं स्वप्नं पूर्ण तर नाही होऊ शकलं…पण माझ्या महालाची काळजी लोकांनी घ्यावी….माझ्या स्वप्नातला महाल लोकांनी जपून ठेवावा… माझा महाल वाचवा….हेच सांगण्याचा प्रयत्न कंचनी राणी नी केलाय…..तिच्या मनातील आवाज एका विटभट्टीवाल्या गरीब घरातील गण्या नी ऐकलाय सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष केलं पण ज्याचं लक्ष नेहमी महलाकडे जायचं….ज्याच्या स्वप्नात कंचनी…. माझा महाल वाचवा अशी विनंती करायची….तो म्हणजे गण्या,… जेव्हा एक विट घेऊन गण्या महालाकडे पळत जातो … महालाला विट जोडतो….. मी तुझा महाल नक्की वाचवेल….त्याला काहीच होऊ देणार नाही इतिहास कालीन असलेली तुझी आणि महालाची ओळख मी मिटू देणार नाही….आज मी एकटा धावलो तुझ्या महालाच्या बचावासाठी पण एक वेळ अशी येईल की तुला माननारे,तुला समजून घेणारे सर्व मेहकर…..लोणार निवासी धाऊन येतील हाच गण्या चा सांगण्याचा प्रामाणिकपणे असलेला उद्देश……….
[सुरुवात अप्रतिम …..आणि शेवट तर खूपच छान डोळ्यात पाणी आले खरंच…..जसे तुम्ही एक वीट घेऊन महालाला जोडण्याचा प्रयत्न केलात…. कंचनी ची ओळख … तिचं नाव …तिची कहाणी …..तिची स्वप्नकथा सर्वांपर्यंत पोहोचावी…. Suspense आहे 😊 to be continue…..best of luck 🙏
नंदकिशोर कडू:
विजू आज मी तुझा कंचनी लघुपट पाहला खूप आनंद झाला, तु जे नवनवीन कार्य करत रहातो त्याचा अभिमान आहे मला , कंचनी लघुपटाच्या माध्यमातून तू मेहकरला एक तुझी नवी ओळख करून दीली , आणि पुरातन वास्तु जतन केल्या पाहिजे याचा खुप मोठा संदेश सुध्दा या लघुपटाच्या माध्यमातून लोकांना मिळाला, आणि तुझ्या माध्यमातून नवीन कलाकारांना सुध्दा एक नवीन संधी मीळाली तसेच तुमच्या सर्व कलाकारांचे अभिनंदन व तुझ्या पुढील वाटचाली साठी तुला शुभेच्छा 💐💐
आणि आशा करतो कि कंचनी २ मध्ये कींवा दूसरा कुटला ही लघुपट बनवशील तेव्हा मलाही अभिनय करण्याची संधी मिळेल अशी आशा करतो…🙏🙏
आयेशा सर्व्हिसेस :
Superb Movie 🎥 Fangal sir Next Part Kadhi Upload karnar आणि सर तुमचं आणि किरण कानोडजे भाऊंच अभिनय मला अप्रतिम आहे असं वाटलं तसे सर्वच चांगले आहेत म्हणा परंतु आपण त्यात दोघे हिरे असल्यासारखे वाटले। बाकी लघुपट हा 👌🏻👌🏻👌🏻👍🏻
वर्षा कंकाळ:
अभिनंदन आणि खूप शुभेच्छा 👍 एव्हढा जुना इतिहास इतक्या कमी वेळेत सांगणे शक्य नसले तरीही खूप छान प्रयत्न केला. पहिली विट लावताना पहिला भाग संपला.तेव्हा खरंच खूप छान वाटलं. दुसऱ्या भागासाठी खूप शुभेच्छा सर. आत्ता बघीतला कंचनी. प्रतिक्रिया द्यावी म्हंटलं👍🏻
विशाल काटकर:
विजय भाऊ पाहिले तर तुमचे फार फार अभिनंदन…..💐💐💐💐💐
सह कलाकार व बाल कलाकाराने पण पण खुप खुप अभिनंदन💐🎂💐🎂
ज्या वास्तूला आज वर लोकांनी पडीत आणि जीर्ण म्हंटल खऱ्या अर्थनी आज तुम्ही या लघुपटाच्या माध्यमातून जीवन दान दिले🙏🏻🙏🙏🙏🏻
आज लघुपट पाहून खुप मन भरून गेले कंचणीचे शब्द मनात घर करून गेले….आपल्या मेहकर चे नाव खऱ्या अर्थाने आज मोठं झालं…या लघुपटाच्या माध्यमातून आज तुम्ही प्रत्येकीच्या मनात कंचणी महालाबद्दल आज ही वास्तू जिवंत आहे अशी उमेद जगवलीत।।।मी अपेक्षा करतो की ही वास्तू अजून प्रचलित व्हावी प्रेक्षणीय ठिकाण बनाव।।।व आजू बाजूला वाढते अतिक्रमण कमी व्हावं।।।।।परत एकदा आपले अभिनंदन💐💐💐💐💐💐🎂🎂💐💐




खुपच सुंदर, कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात ही एकापासूनच होते. मग सर्वच येणार…
हा विश्वास कंचनी महाल संवर्धन करण्यासाठी आपल्या लघुपटातुन जाधवला. आता मदतीचे हात पुढे आले पाहिजे आणि ते कार्य आपल्या हातून घडले पाहिजे हीच अपेक्षा.